Last Updated: Monday, August 27, 2012, 23:49
www.24taas.com,मुंबई आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती स्वीकारणाऱ्या क्रिकेटपटू राहुल द्रविड याची पद्मभूषण, तर सलामीवीर गौतम गंभीरची पद्मश्री पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) शिफारस केल्याचे वृत्त आहे.
देशातील सर्वोत्तम पुरस्कारांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार असलेल्या पद्मभूषण पुरस्कारासाठी राहुल द्रविडचे नाव पुढे आले आहे. द्रविडने मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आतापर्यंत पद्मभूषण पुरस्काराने नऊ क्रिकेटपटूंना सन्मानित करण्यात आले आहे.
गेल्या काही सामन्यांत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या गौतम गंभीर याची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला १९९९ मध्ये पद्मश्री आणि २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाले आहेत.
First Published: Monday, August 27, 2012, 17:02