`साक्षीच्या बाजूला बसणं सगळ्यात मोठी चूक`, Biggest mistake of my life to sit with Sakshi Dhoni: Vindoo

`साक्षीच्या बाजूला बसणं सगळ्यात मोठी चूक`

`साक्षीच्या बाजूला बसणं सगळ्यात मोठी चूक`
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणी विंदू दारा सिंगला मंगळवारी जामीन मिळाला. त्यानंतर त्यानं आपण निर्दोष असल्याचं त्यानं म्हटलंय. स्पॉट फिक्सिंगबद्दल आपलं कोणत्याही खेळाडूशी काहीही बोलणी केली नसल्याचं विंदूनं म्हटलंय.

‘चेन्नई सुपर किंग्जचा मालक गुरुनाथ मयप्पन हा माझा मित्र आहे आणि त्याचाही स्पॉट फिक्सिंग प्रकरणाशी काहीही संबंध नाही’ अशी पृष्टीदेखील त्यानं जोडलीय. आपल्या केवळ एका चुकीमुळे आपलं नाव या प्रकरणाशी जोडलं गेल्याचं विंदूला वाटतंय आणि ती चूक म्हणजे आयपीएलच्या मॅचसाठी साक्षी धोनीच्या बाजूला बसणं... ‘चेन्नई सुपर किंग्ज आणि भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनी हिच्या बाजूला बसून मी माझ्या आयुष्यातील खूप मोठी चूक केली. मला साक्षीबद्दल खूप वाईट वाटतंय’.

पाकिस्तानचा अम्पायर असद रौफ हादेखील आपला मित्र आहे आणि तोही स्पॉट फिक्सिंग प्रकरणाशी संबंधित नाही असा निर्वाळाही यावेळी विंदूनं दिलाय. विंदूच्या म्हणण्यानुसार, मीडियाच्या बातम्या आणि पोलिसांची माहिती खोटी असून बुकी म्हणून अटकेत असलेले संजय जयपूर आणि पवन जयपूर हेही बुकी नाहीत.

२२ मे रोजी मुंबई पोलिसांनी विंदूला बुकींच्या संपर्कात असल्याच्या तसेच सट्ट्यात सहभाग असल्याच्या आरोपावरून अटक केली होती. विंदूच्या चौकशीनंतर त्यानं दिलेल्या माहितीमुळे बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई मयप्पनही गोत्यात आला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 5, 2013, 15:20


comments powered by Disqus