मुंबई इंडियन्सच्या पराभवाची हॅटट्रिक, चेन्नई `सुपरकिंग`, Brendon McCullum powers CSK to 7-wicket win

मुंबई इंडियन्सच्या पराभवाची हॅटट्रिक, चेन्नई `सुपरकिंग`

मुंबई इंडियन्सच्या पराभवाची हॅटट्रिक, चेन्नई `सुपरकिंग`
www.24taas.com, झी मीडिया, शारजा

मुंबई इंडियन्सच्या पराभवाची मालिका सुरुच आहे. सलग तिसरा पराभव त्यांच्या पदरी पडला आहे. मोहित शर्माची प्रभावी गोलंदाजी आणि ब्रॅण्डन मॅक्कलमची अफलातून फलंदाजी याच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने शुक्रवारी झालेल्या आयपीएलमधील लढतीत मुंबई इंडियन्सचा ७ गडी व ६ चेंडू राखून धुव्वा उडवला आणि स्पर्धेतला तिसरा विजय मिळवला.

मुंबई इंडियन्सच्या १४२ धावांचा पाठलाग करणार्‍या चेन्नई सुपरकिंग्जने अवघे ३ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. मॅक्कलमने ५३ चेंडूत २ षटकार व ८ चौकारांनिशी नाबाद ७१ धावांची खेळी साकारत चेन्नई सुपरकिंग्जच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

हरभजन सिंगने दोन, तर प्रग्ज्ञान ओझाने एक बळी बाद करीत मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी प्रयत्न केले. दरम्यान, याआधी प्रथम फलंदाजी करणार्‍या मुंबई इंडियन्सला १४१पर्यंतच मजल मारता आली. कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५० धावा केल्या. तेज गोलंदाज मोहित शर्माने अवघ्या १४ धावा देत मुंबई इंडियन्सच्या चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, April 26, 2014, 09:38


comments powered by Disqus