Last Updated: Sunday, September 23, 2012, 16:59
www.24taas.com, मुंबई वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने अचानक क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्या घरी जाऊन त्याला भेट देत आश्चर्याचा धक्का दिला. या दोन महान फलंदाजांच्या भेटीचा कार्यक्रम पूर्व नियोजित नसल्याची माहिती समोर आली आहे.
सचिन तेंडुलकरने आज आपल्या फेसबुक आणि ट्विटर खात्यावर लारा आणि त्याच्या भेटीचे फोटो अपलोड केले आहेत. लाराच्या संदर्भात तेंडुलकरने ट्विटरवर म्हटले की, अंदाज लावा आज मला भेटायला कोण आले असेल? एक शानदार खेळाडू आणि माझा चांगला मित्र.
गेल्या काही दिवसांपूर्वी लाराने सचिनसाठी बॅटिंग करताना म्हटले होते की, सचिन अजून एक दोन वर्ष क्रिकेट खेळू शकतो. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत खराब कामगिरी करणाऱ्या तेंडुलकरने निवृत्त व्हावे का अशी चर्चा रंगू लागली असताना लाराने सचिनच्या समर्थनार्थ मोर्चा उघडला होता.
सचिनने यापूर्वीच टी-२० सामन्यात खेळणे सोडले आहे, हे मला माहित आहे. तो वन डे खेळतो आहे की नाही हे मला माहिती नाही. परंतु त्याच्यामध्ये अजूनही एक दोन वर्ष कसोटी खेळण्याची क्षमता आहे.
First Published: Sunday, September 23, 2012, 16:57