Last Updated: Sunday, February 17, 2013, 11:16
www.24taas.com,नवी दिल्लीक्रिकेट पिचवर एकामागून एक यशाची शिखरं पादाक्रांत करणारा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी मैदानाबाहेर मात्र फेल झालाय.
धोनीनं २००८मध्ये रांचीमधल्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये ऑफिस एडमिनिस्ट्रेशन अँड सक्रेटेरियल प्रॅक्टीस कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. मात्र आतापर्यंत झालेल्या सहा सेमिस्टर्सपैकी एकाही परीक्षेत धोनी पास होऊ शकला नाही.
धोनीचं क्रिकेट बिझी शेड्युल पाहता त्याला अटेंडन्समध्येही सवलत देण्यात आली होती. मात्र धोनी अभ्यासासाठीही वेळ देऊ शकलेला नाही असं दिसतं कारण या परीक्षांमध्ये त्याला केवळ अपयशच आलंय.
आता यावर्षी तर त्याचं रजिस्ट्रेशनही रद्द होऊ शकतं याचा अर्थ तो पुन्हा या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरू शकत नाही. त्यामुळे आता ये पप्पू कब पास होगा असाच प्रश्न विचारला जातोय.
First Published: Sunday, February 17, 2013, 11:16