धोनी ब्रिगेड इंग्लंडला देणार धक्का, Champions Trophy, England vs India

धोनी ब्रिगेड इंग्लंडला देणार धक्का

धोनी  ब्रिगेड इंग्लंडला देणार धक्का
www. 24taas.com, झी मीडिया, इंग्लंड

यंगिस्ताननं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कमालच केलीय. आतापर्यंतच्या मॅचेसमध्ये धोनीचे युवा योद्धे प्रतीस्पर्धी टीम्सवर भारी पडलेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वात यंगेस्ट टीम असलेला माही ब्रिगेड आता विजेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात रविवारी फानल होत आहे. यात कोण बाजी मारतो याकडे लक्ष लागलंय.

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील टीम इंडियाच्या या नव्या रंगापुढे इतर टीम्सचे रंग फिक्के झालेले दिसले. शिखरचा धमाका.. रोहितचा जलवा .. विराटचा दणका आणि जाडेजाची जादू यापुढे सर्वच टीम्स निष्प्रभ ठरल्यात. टीम इंडियाची यंगिस्तान सर्वच मैदानात सुपरहिट ठरली. विजयासाठी कॅप्टन जी रणनीती आखतो..त्यात हे सर्व चेहरे फिटही आहेत आणि हिटही आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वात यंग टीम अशी टीम इंडियाची ओळख आहे... याच यंगस्टर्सनी आपल्या परफॉर्मन्सनी दादा टीम्सना पराभवाची चव चाखायला लावली. द.आफ्रिका असो अथवा वेस्ट इंडिज, पाकिस्तान असो किंवा श्रीलंका सर्वांनी या यंगिस्तानपुढे शरणागती पत्करली.

कॅप्टनने दाखवलेला विश्वास या खेळाडूंनी आपल्या खेळाने सार्थ करून दाखवला आणि त्याचाच परिपाक म्हणजे वॉर्म-अप मॅचपासून सेमी-फायनलपर्यंत टीम इंडिया अपराजित राहिली. यंगिस्तानच्या या अशा आक्रमक खेळामुळेच टूर्नामेंटआधी सर्वात कमजोर मानली गेलेली भारतीय टीम विजेतेपदाची प्रमुख दावेदार ठरली आहे. टीमची बॉलिंग असो किंवा बॅटिंग फरक जाणवतोय. यंगिस्तानचं आक्रमण रोखणं सध्या प्रतिस्पर्ध्यांकरता अवघड बनलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, June 22, 2013, 23:18


comments powered by Disqus