आयपीेएल : चेन्नईचा पंजाबच्या मॅक्सवेलने उडवला धुव्वा, chennai superkings vs kings eleven punjab

आयपीेएल : चेन्नईचा पंजाबच्या मॅक्सवेलने उडवला धुव्वा

आयपीेएल : चेन्नईचा पंजाबच्या मॅक्सवेलने उडवला धुव्वा
www.24taas.com, झी मीडिया, अबू धाबी

इंडियन प्रीमियर लीगमध्ये झालेल्या चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब या शुक्रवारी रंगलेल्या सामन्यात लोकांना धुव्वाधार खेळाची मजा पहायला मिळाली. चेन्नई सुपरकिंग्सच्या २०५ धावांचा पाठलाग किंग्स इलेव्हन पंजाबने चक्क ७ बॉल राखून पूर्ण केला. किंग्स इलेव्हन पंजाबने चार विकेट ठेऊन २०६ धावा पूर्ण केल्या आणि सामना जिंकला.

या आधी सुपरकिंग्सने मॅचमध्ये मॅक्युलम आणि स्मिथ यांच्या १२३ धावांची पार्टनरशिप करत २०५ धावा केल्या. यात मॅक्युलमने ६७ धावा तर स्मिथने ६६ धावा जोडल्या.

सेकंड इनिंगमध्ये मात्र ग्लेन मॅक्सवेलने सुपरकिंग्सचे तीन तेरा उडवून टाकले. मॅक्सवेलने ४३ बॉलमध्ये ९५ धावा केल्या. धावाचा पाठलाग करताना मॅक्सवेलला डेविड मिलरने नाबाद ५४ धावांची साथ दिली. मॅक्सवेलने आपल्या खेळीत १५ चौकार आणि २ सिक्सर ठोकले. तर डेविड मिलरने ३ चौकार आणि ३ सिक्सर मारुन २०६ धावांचे लक्ष्य ७ बॉल ठेऊन पूर्ण केले.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, April 19, 2014, 12:30


comments powered by Disqus