Last Updated: Tuesday, April 23, 2013, 18:24
www.24taas.com, बंगळुरु, आयपीएल-६मध्ये बंगळुरुकडून खेळताना ख्रिस गेलची वादळी बॅटींग पाहायला मिळाली. गेलनं ३० बॉलमध्ये १०२ रन्स करत जलदगती विक्रमी शतक ठोकलं. खणखणीत चौकार आणि षटकारांची उतुंगबाजी करत शतक लगावले.
ख्रिस गेलने १७५ रन्स केवळ ६६ बॉलमध्ये केल्या. तो नाबाद राहिला. त्यांने १३ चौकार आणि १७ षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट २६५.१५ एवढा होता. गेलने झपिंग झपाक केलं.
शतक करताना गेलनं १० चौकार आणि १६ षटकार मारले. त्यांने ५३ बॉल्समध्ये १५३ रन्स फटकावल्यात. तुफान फटकेबाजी करत पुणे वॉरिअर्स गोलंदाजांची फिसं काढलीत. पुणे वॉरिअर्सचे गोलंदाज गेल वादळापुढे हतबल झालेत.
इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात वेगवान शतक आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर ३१ वी मॅच सुरू आहे. पुणे वॉरिअर्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय चांगलाच महागात पडलेला दिसतोय. गेलने तुफान फटकेबाजी करत क्रिकेट रसिकांचे मनोरंजन केले. त्याच्या फटक्यांनी डोळ्यांचे पारणे फिटले.
First Published: Tuesday, April 23, 2013, 17:53