सचिन `काँग्रेस`चा खासदार?, Controversial poster claims `Sachin Tendulkar is Congress MP`

सचिन `काँग्रेस`चा खासदार?

<B> सचिन `काँग्रेस`चा खासदार? </b>
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई

सध्या सर्वत्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीची चर्चा सुरू असताना आणि त्यासंदर्भातील पोस्टर्स सगळीकडे लागत असताना नवी मुंबईतील एका पोस्टरने मात्र खळबळ उडाली आहे. सचिन तेंडुलकर चक्क ‘काँग्रेस’चा खासदार असल्याची पोस्टर्स नवी मुंबईत लावण्यात आली आहेत.

सचिनला राष्ट्रपतींनी खासदार म्हणून नियुक्त करण्यात आलंय. यासाठी त्याच्या नावाची शिफारस जरी काँग्रेसकडून करण्यात आली असली, तरी सचिन काँग्रेसचा खासदार नसून राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. तरीही नवी मुंबईत सचिनची ‘काँग्रेस खासदार’ अशी पोस्टर लावल्यानं शिवसैनिक तसंच क्रीडा प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

सचिन तेंडुलकर ही कोणा एकाची मक्तेदारी नाही. त्याच्या नावावर मतं मिळवण्याचा केविलवाणा खटाटोप काँग्रेस खासदार करत आहेत, अशी टीका नवी मुंबईकरांनी केली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

पाहा व्हिडिओ


First Published: Wednesday, November 6, 2013, 10:51


comments powered by Disqus