लग्नापूर्वी वधू-वरांनी लगावले चौके-छक्Cricket match between bride and groom before marriage in sikar

लग्नापूर्वी वधू-वरांनी लगावले चौके-छक्के!

लग्नापूर्वी वधू-वरांनी लगावले चौके-छक्के!
www.24taas.com, झी मीडिया, सीकर
आपल्या हातात तलवार घेऊन नवरदेवाला तुम्ही घोड्यावर चढताना नेहमी पाहिलं असेल, पण हातात बॅट घेऊन क्रिकेटच्या मैदानावर उतरताना कधीच पाहिलं नसेल. नवरीलाही साजश्रृंगार करून पतीसोबत सातफेरे घेतांना पाहिलं असेल, पण मैदानात पतीला बोल्ड करताना तुम्ही पाहिलं नसेल.

पण असं काहीसं चित्र गुरूवारी आसाममधून विवाह करण्यासाठी राजस्थानच्या सीकरमध्ये आलेल्या दोन्ही कुटुंबात दिसले. दोन्ही कुटुंबीयांनी लग्नापूर्वी एक मॅच खेळली. नवरदेवाचा वेश परिधान केलेला, डोक्याला सेहरा आणि कंबरेला कट्यार लावलेला धनेश आपल्या पत्नीकडून टाकण्यात आलेल्या चेंडूवर चौके-छक्के मारताना दिसला.

दुसरीकडे, वधू संगीताने साजश्रृंगार करून पतिला आउट करण्यासाठी कंबर कसली होती. १०-१० ओव्हर्सचा हा सामना खूपच इंटरेस्टिंग होता. यावेळी वऱ्हाडी आणि पाहुण्यांनी केलेल्या चेअरिंगमुळे खूपच मजा आली. लग्नाच्या एक दिवसांपूर्वी खेळण्यात आलेल्या या सामन्यात वर पक्ष १२ धावांनी जिकंला. पण विजयोत्सव दोन्ही टीम्सने केला.

नवरदेवाची इच्छा आणि वधु पक्षाची सहमती
लग्नापूर्वी क्रिकेट मॅच खेळण्याची इच्छा नवरदेव असलेल्या धनेशने संगिताचे वडील गौतम शर्मा यांच्याकडे व्यक्त केली होती. धनेश आसामच्या गुवाहाटी टी ऑक्शन सेंटरच्या क्रिकेट टीमचा खेळाडू आहे. लग्नापूर्वी दोन्ही कुटुंबीयांमध्ये चांगले संबंध निर्माण करण्यासाठी धनेश यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव वधु पक्षाने मान्य केला.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 2, 2014, 13:47


comments powered by Disqus