Last Updated: Saturday, August 31, 2013, 17:17
www.24taas.com झी मीडिया, मुंबईजगभरातील ग्लॅमरस ट्वेण्टी-२० स्पर्धेत उल्लेखनीय असणाऱ्या संघांना आता भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स लीग ट्वेण्टी-२० स्पर्धेत खेळता येणार आहे. ही स्पर्धा येत्या सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.
१७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत खेळणारे खेळाडू हे आयपीएलमधील संघांमधून खेळणार्याे क्रिकेटपटूच असतील. श्रीलंकेचा कुमार संगक्कारा हा एकमेव क्रिकेटपटू स्थानिक संघामधून खेळणार आहे. संगक्कारा चॅम्पियन्स लीगमध्ये कंडुरता मरून्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
चॅम्पियन्स लीग ट्वेण्टी-२० स्पर्धेत राहूल द्रविड आणि सचिन तेंडुलकरची निवड करण्यात आली आहे. गेल्या मौसमात आयपीएलचे जेतेपद पहिल्यांदाच पटकवलेल्या मुंबई इंडियन्सच्या सचिन तेंडुलकरने यामधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. तर चॅम्पियन्स लीग ट्वेण्टी-२० स्पर्धात अखेरची कारकीर्द असणार आहे, असं राहुल द्रविडने सांगितले आहे. सचिन हा मुंबई इंडियन्समध्ये तर राजस्थान रॉयल्समध्ये द्रविडला स्थान देण्यात आले आहे.
या स्पर्धेत आयपीएलच्या संघांतील ड्वेन ब्राव्हो (चेन्नई सुपरकिंग्ज), केव्होन कुपर (राजस्थान रॉयल्स), कायरॉन पोलार्ड (मुंबई इंडियन्स), डुप्लेसीस (चेन्नई सुपरकिंग्ज), ऍल्बी मॉर्केल (चेन्नई सुपरकिंग्ज), ख्रिस मॉरीस (चेन्नई सुपरकिंग्ज) हे खेळाडू खेळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, August 31, 2013, 17:17