Last Updated: Monday, October 28, 2013, 14:29
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईपाकिस्तानच्या टीमला पराभूत केल्यास भारताच्या टीममधील प्रत्येक क्रिकेटरला टोयोटा करोला गाडी गिफ्ट देण्याची ऑफर दाऊद इब्राहिमनं दिली होती, असा खुलासा भारताचा माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांनी केलाय.
शारजात पाकिस्तान विरुद्धची मॅच असताना दाऊद आला होता यावेळी मेहमूदबरोबर दाऊद ड्रेसिंग रूममध्ये आला होता. यावेळी पत्रकार परिषद आटोपून टीममधील सर्व क्रिकेटपटूंना ब्रीफिंग करण्यासाठी आलेल्या कपील देवनं मात्र, ‘तू कौन है?’ असा एकेरी उल्लेख करत दाऊदला ड्रेसिंग रूमच्या बाहेर काढलं होतं.
त्यामुळं रागारागात निघून गेलेल्या दाऊदनं तिथंच भारताच्या टीममधील प्रत्येक क्रिकेटरला टोयोटा करोला गाड्या गिफ्ट देण्याची ऑफर नाकारली होती, असा गमतीदार किस्साही वेंगसकर यांनी सांगितला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, October 28, 2013, 14:00