Last Updated: Wednesday, October 24, 2012, 13:03
www.24taas.com, सेंच्युरीयन
कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला जे जमलं नाही, ते सेहवाग करून दाखवणार का? याकडेच क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिलेलं आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने चॅम्पियन्स लीग टी-20 च्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झालेल्या सामन्यात टायटन्स आणि दिल्ली संघाला प्रत्येकी दोन गुण देण्यात आले. वीरेंद्र सेहवागने संपूर्ण मालिकेत चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन करीत संघाला सेमीफायनलमध्ये पाहोचवण्यास चांगलीच मदत केली.
पहिला सेमीफायनल सामना दिल्ली आणि हायवेल्ड लॉयन्स यांच्यादरम्यान 25 तारखेला खेळण्यात येईल. तर दुसरा सेमीफायनल सिडनी सिक्सर्स विरूद्ध टायटन्स दरम्यान 26 तारखेला खेळला जाणार आहे.
चॅम्पियन्स लीग टी-20 मध्ये आयपीएलच्या चार संघानी भाग घेतला होता. 2012 चा विजेता संघ कोलकाता नाईट रायडर्सला अवघ्या एकाच सामन्यात विजय मिळवता आल्यामुळे सर्वात पहिल्यांदा बाहेर मालिकेबाहेर जावे लागले
First Published: Wednesday, October 24, 2012, 12:43