दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘धवन’नं गाठलं नवं ‘शिखर’, Dhawan misses world record by 20 runs, scores 248 vs SA `A`

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘धवन’नं गाठलं नवं ‘शिखर’

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘धवन’नं गाठलं नवं ‘शिखर’
www.24taas.com , झी मीडिया, प्रिटोरिया

दक्षिण आक्रिफा अ संघाविरुद्ध वनडे मॅचमध्ये भारतीय अ संघाचा धडाकेबाज ओपनर शिखर धवननं डबल सेंच्युरी झळकावत नवा विक्रम केलाय. मात्र, शिखर इंग्लंडचे क्रिकेटपटू ऍलिस्टर ब्राउन यांचा 268 धावांचा विक्रम मोडण्यात अपयशी ठरला. धवन 248 धावांवर आऊट झाला. पण शिखर धवननं विरेंद्र सेहवागचा वेस्टइंडिज विरुद्ध ८ डिसेंबर २०११ला इंदोर इथं केलेल्या २१८ रन्सचा रेकॉर्ड मोडला.

धवन आणि मुरली विजय यांनी भारतीय डावाची सुरुवात केली होती. सुरवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत धवननं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. दोघांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 91 धावांची भागिदारी नोंदविली. त्यानंतर शिखरनं कर्णधार चेतेश्वर पुजारासह दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर हल्ला चढविला. अखेर तो 248 धावांवर आऊट झाला.

आपल्या आक्रमक फलंदाजीनं अल्पावधीतच प्रसिद्धी मिळविलेल्या शिखऱ धवननं अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी भारतासाठी महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात हा विक्रम प्रस्थापित केलाय. टीमच्या चाळीसाव्या ओव्हरमध्ये 311 रन्स केले असताना धवननं 200 रन्सचा टप्पा पार केला. त्यानं अवघ्या 132 बॉलमध्ये 24 चौकार आणि 4 षटकारांसह डबल सेंच्युरी झळकावली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, August 12, 2013, 19:37


comments powered by Disqus