शिखर धवन 'विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर' Dhawan named one of Wisden`s Five Cricketers of the Year

शिखर धवन 'विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर'

शिखर धवन 'विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर'
www.24taas.com, झी मीडिया

भारतीय क्रिकेट शिखर धवन 2014 या वर्षाचा विस्डन क्रिकेटर ठरला आहे. या यादीत फक्त पाच सर्वश्रेष्ठ खेळाडूंचा समावेश करण्यात येतो.

शिखर धवनने 2013 मध्ये केलेल्या खेळाच्या आधारावर ही निवड करण्यात आली आहे. विझडकडून 1889 पासून दरवर्षी सर्वोत्तम खेळाडूंची यादी जाहीर केली जाते

शिखऱ धवन 28 वर्षांचा आहे, आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटर धवन ठरला आहे. शिखर धवनने पाच एकदिवशीय सामन्यांमध्ये 363 धावा केल्या.

शिखरला मालिकेसाठी मॅन ऑफ द सिरीजही निवडण्यात आलं. शिखरने या मालिकेत दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरोधात शतक केलं होतं.

शिखर शिवाय ऑस्ट्रेलियाचा ख्रिस रोजर्स आणि रियान हॅरिस, इंग्लंडचा बॅटसमन रूट आणि इंग्लडची महिला क्रिकेटर शॅरलेट एडवर्डसलाही विस्डनच्या यादीत स्थान देण्यात आलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 9, 2014, 16:38


comments powered by Disqus