पहा धोनीला नडलं तरी कोण?, Dhoni and watson matter

पहा धोनीला नडलं तरी कोण?

पहा धोनीला नडलं तरी कोण?
www.24taas.com, नवी दिल्ली

सीरिजमध्ये आतापर्यंत सातत्याने पराभवाला सामोरं जाणा-या कांगारूंना दिल्ली टेस्टच्या दुस-या दिवशी भलताच चेव चढलेला दिसला... पराभवाची हॅट्ट्रीक झाल्यानंतर दिल्लीमध्ये जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने... पराभव टाळण्यासाठी कुछ भी करण्याची तयारी असल्याचं आपल्या वर्तणुकीने दाखवून दिलं....

सर्वप्रथम पीटर सिड्लने टेस्ट पदार्पण करणा-या अजिंक्य रहाणेला डिवचण्याचा प्रयत्न केला... तेव्हा अजिंक्यनेही सिड्लला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं...

कॅप्टन धोनीला पॅटिन्सनने रन काढताना अडथळा केल्यावर... धोनीने अंपायर आलीम दारकडे तक्रार केल्यानंतर ... डेव्हिड वॉर्नर धोनीशी वाद घालण्याकरता सरसावला... धोनी आणि वॉर्नरमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतर अंपायरने मध्यस्ती केली. मात्र पुन्हा एकदा कॅप्टन वॉटसन पुढे सरसावला. त्याने पुन्हा एकदा धोनीला टार्गेट केले. मात्र धोनीही मागे हटला नाही. त्यानेही आपला बाणेदारपणा दाखवत वॉटसनला जशास तसे उत्तर दिले. त्यामुळे ऑसी खेळाडू जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्यास तयार झाले होते. मात्र ते काही त्यांना जमू शकले नाही.

First Published: Saturday, March 23, 2013, 23:29


comments powered by Disqus