...अन् धोनीनेही केला `छऊ नाच`, Dhoni Dance on Jharkhand new Stadium

...अन् धोनीनेही केला `छऊ नाच`

...अन् धोनीनेही केला `छऊ नाच`
www.24taas.com, रांची

झारखंडच्या आदिवासी संस्कृतीची ओळख असणाऱ्या छऊ नृत्यावर भारतीय टीमचा कॅप्टन आणि रांचीचा लोकल बॉय असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने ठेका धरला. स्वत ढोल हाती घेत तो वाजवित धोनीने नृत्य केलं. झारखंड राज्या क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान तयार केलं आहे. धोनीने नृत्य करीत उपस्थितांचं मन जिंकून घेतलं. रांची च्या राजकुमाराने अगदी वेगळ्याच अंदाजात नाच केला.

त्याच्यासोबत पत्नी साक्षीदेखील कार्यक्रमास हजर होती. बीसीसीआयच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी ह्या कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. अनेक कलाकरांनी नृत्य करीत होते. मात्र जेव्हा धोनी नाचण्यासाठी गेला तेव्हा प्रेक्षकांमध्ये अनेकजणांची एकच कल्ला केला.

धोनी व्यासपीठावर बसला होता. त्यामुळे धोनीकडे तेथील कलाकरांनी त्याच्यासोबत नृत्य करावे अशी इच्छा व्यक्त केली. त्यामुळे धोनीने त्यांच्या मागणीचा मान ठेवीत त्याच्यांसोबत ताल धरला. धोनीने ढोल वाजवित त्या टीमसोबत नृत्य केलं. त्यामुळे प्रेक्षक धोनीवर भलतेच खूष झाले.

First Published: Saturday, January 19, 2013, 22:12


comments powered by Disqus