रोहितला उत्तम बॅट्समन बनवण्याचं श्रेय धोनीला- गांगुलीDhoni has transformed Rohit Sharma`s career

रोहितला उत्तम बॅट्समन बनवण्याचं श्रेय धोनीला- गांगुली

रोहितला उत्तम बॅट्समन बनवण्याचं श्रेय धोनीला- गांगुली
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

रोहित शर्माला शानदार बॅट्समन बनवण्याचं श्रेय हे कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला दिलं पाहिजे, असं माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं म्हटलं आहे.

गांगुली म्हणाला, रोहितला आपल्यातील गुणवत्तेची कल्पना नव्हती. मात्र, धोनीनं सतत त्याला संधी देऊन त्याला परिपक्व बनवलं. सध्या तो भारतीय टीममधील एक चांगला ओपनर म्हणून पुढे येतोय.

शंभर वन-डे खेळूनही एकही टेस्ट न खेळणारा रोहित हा एकमेव क्रिकेटपटू होता. पण, त्याला अखेर टेस्टमध्ये संधी मिळाली. त्याची बॅटिंगची शैली पाहता तो एक उत्तम क्रिकेटपटू म्हणून उभारत असल्याचं दिसतंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.



पाहा व्हिडिओ


First Published: Monday, November 11, 2013, 19:17


comments powered by Disqus