धोनीमुळे महिला ढसाढसा रडली!, dhoni hits a lady in champions league t20

धोनीमुळे महिला ढसाढसा रडली!

धोनीमुळे महिला ढसाढसा रडली!
www.24taas.com
चॅम्पियन्स लीग टी-20 मालिकेच्या शेवटच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी आपल्या जुन्या आक्रमक अंदाजात तुफान फटकेबाजी केली. मात्र, यादरम्यान त्याने एका महिलेला जखमी केले. या जखमेमुळे या महिला वेदना सहन होत नव्हत्या, त्यामुळे ती ढसाढसा रडली.

या सामन्यात नव्या रूपात दिसून आला. यॉर्कशायरविरूद्धच्या सामन्यात त्याने कर्णधारपद सुरेश रैना याच्याकडे दिले होते. या सामन्यात त्याने आपल्या गोलंदाजीचे कसबही दाखवले.

16 व्या षटकात धोनीने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. अझीम रफिकच्या गोलंदाजीवर त्याने लॉंगऑनच्या दिशेने चेंडू सीमोरेषेच्या बाहेर धाडला. त्याच्या या षटकाराने एकीकडे संपूर्ण मैदानात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते, तर दुसरीकडे प्रेक्षकांमध्ये बसलेल्या महिलेला आपले अश्रू आवरता येत नव्हते. धोनीने मारलेला तो षटकार सरळ त्या महिलेच्या पायाला लागला. त्यामुळे तिला त्या वेदना असह्य होत होत्या.

यापूर्वी आयपीएलमधील एका सामन्यादरम्यान क्रिस गेलच्या षटकारामुळे एक मुलगी जखमी झाली होती. त्या मुलीला पाहण्यासाठी गेल दुस-या दिवशी रूग्णालयातही गेला होता.

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान लॉर्डस येथे झालेल्या वनडेमध्ये आफ्रिदीच्या षटकारामुळे एक चाहता जखमी झाला होता. आफ्रिदीने मारलेला चेंडू झेलण्या्चा त्याने प्रयत्न केला होता. मात्र चेंडू सरळ त्याच्या नाकावर जाऊन आदळला होता.

First Published: Tuesday, October 23, 2012, 14:56


comments powered by Disqus