अंतिम ओव्हरमध्ये १५ रन्सची खात्री होती - धोनी, Dhoni,India beat Sri Lanka

अंतिम ओव्हरमध्ये १५ रन्सची खात्री होती - धोनी

अंतिम ओव्हरमध्ये १५ रन्सची खात्री होती - धोनी
www.24taas.com, झी मीडिया,पोर्ट आफ स्पेन

टीम संकटात आहे. अशावेळी मला खात्री होती की, मी शेवटच्या ओव्हरमध्ये १५ रन्स करीन म्हणून, अशी प्रतिक्रिया ट्राय सिरीजच्या विजयानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिली.

ज्यावेळी टीम इंडिया संकटात सापडते त्यावेळी धोनी धाऊन येतो. हे प्रत्यय पुन्हा एकदा ट्राय सिरीजच्यावेळी पाहायला मिळाले. धोनीने शेवटच्या ओव्हरमध्ये २ सिक्स आणि १ फोर मारून विजय साकारला. तोच अंतिम सामन्याच्या विजयाचा शिल्पकार ठरला. धोनीने नाबाद ४५ रन्स ५२ बॉल्समध्ये केले आणि अंतिम रोमांचकारी सामन्यात श्रीलंकेविरोधात विजय खेचून आणला.

जायबंदी धोनीने अंतिम सामन्यात परतताना चांगले प्रदर्शन केले. धोनी म्हणाला, मला क्रिकेटची चांगली ओळख झाली आहे. मला माहित होते की, मी अंतिम ओव्हरमध्ये १५ रन्स करू शकतो. मला आनंद आहे की, मी हे काम केले आहे. २०२ रन्सचे टार्गेट पार करताना धोनी शेवटच्या ओव्हरमध्ये ४५ रन्स करताना १६ रन्स कुटल्या. यात त्यांने पहिला सिक्स मारला. त्यानंत फोर आणि चौथ्या बॉलवर सिक्स मारून विजय मिळविला. धोनीला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरविण्यात आले. धोनीबरोबरच रोहित शर्माने अर्धशतक करताना ५८ रन्स केल्या.



मैदानावर १५ खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले आहे. हे आमच्या टीमसाठी चांगले संकेत आहेत. श्रीलंकेकडून शमिंदा इरांगा बॉलिंग करीत होता. तो लसिथ मलिंगाप्रमाणे अनुभवी नव्हता. याचाच मी फायदा उठविण्याचा विचार केला.

विराट कोहलीबरोबरच विजयी चषक धोनीने स्वीकारला. तर भुवनेश्वर कुमार याला सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून गौरविले. रोहित शर्माला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. यावेळी रोहित शर्मा म्हणाला, आम्ही चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे मी खूश आहे. विकेट जात असताना शॉट खेळणे अवघड होते. मी विकेटवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला. यावेळी विराट धोनीचे कौतुक केले. धोनी अशी खेळी खेळण्यास सक्षम आहे. त्यामुळे यात काही आश्चर्य मानण्याचे कारण नाही.

First Published: Friday, July 12, 2013, 14:25


comments powered by Disqus