कपिल देवच्या सार्वकालिक टीमचा कॅप्टन धोणी! Dhoni to lead Kapil`s greatest all-time Indian ODI team

कपिल देवच्या सार्वकालिक टीमचा कॅप्टन धोणी!

कपिल देवच्या सार्वकालिक टीमचा कॅप्टन धोणी!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

माजी भारतीय कॅप्टन कपिल देवने भारतीय टीमला प्रथम विश्वचषक मिळवून दिला आहे. या दिग्गज क्रिकेटरने ज्या सार्वकालिक भारतीय वन डे टीमची निवड केली आहे, त्यात मात्र कर्णधारपद स्वतःकडे न ठेवता चक्क धोणीला दिलं आहे.

१९८३ सालच्या विश्वचषक विजेत्या टीममध्ये जे १२ खेळाडू सामिल करण्यात आले आहेत, त्यात सौराष्ट्राचा रविंद्र जडेजाचाही समावेश आहे. तसंच दोनस्पिनर्सच्या रूपात हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे यांचा समावेश आहे. दोणी व्यतिरिक्त या टीममध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, विराट कोहली, मोहम्मद अझरुद्दीन, युवराज सिंग या फलंदाजांची नावं आहेत. झहीर खान आणि जवागल श्रीनाथ हे दोन फास्ट बॉलर्सही या यादीत आहेत.

मात्र महत्वाची बाब अशी की या १९८३ साली विश्वचषक मिळवून देणाऱ्या टीममधील एकाही खेळाडूचं नाव यात समाविष्ट नाही. याबद्दल कपिल देवला विचारलं असता, सध्याची क्रिकेट टीम ही भारताची सर्वश्रेष्ठ टीम आहे, असं कपिल उत्तरले. हे मत आपलं वैयक्तिक मत असल्याचं कपिल देवने म्हटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, August 15, 2013, 18:57


comments powered by Disqus