Last Updated: Wednesday, November 13, 2013, 11:56
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई१४ नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर अखेरचा सामना खेळणार आहे. या सामन्याबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. याच चाहत्यांमध्ये एक चाहता आहे साक्षात आमिर खान...
सचिनच्या शेवटच्या मॅचच्या निमित्ताने अभिनेता आमिर खान आपल्या आगामी धूम ३ सिनेमाचं शीर्षक गीत सचिन तेंडुलकरला अर्पण करणार आहे. डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या धूम ३ या सिनेमात आमिर खान चोराच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनचा भाग म्हणून धूम ३ चं पहिलं गाणं मोठ्या थाटामाटात रिलीज करण्याचा बेत होता. सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीचा मुहूर्त साधत आमिर खानने आपलं गाणं सचिन तेंडुलकरलाच अर्पण करण्याचं ठरवलं आहे.
धूम शब्दाचा सचिनच्या कारकीर्दीशी जवळचा संबंध आहे. सचिनच्या खेळीने क्रिकेटप्रेमींना खरा धूमचा अनुभव दिला आहे. सचिन हा भारतीयांच्या अभिमानाचं मूर्त स्वरूप आहे. मी त्याचा मोठा फॅन आहे. सचिनच्या रिटायरमेंटनंतर कायम त्याची कमतरता जाणवत राहील, असं आमिर खान म्हणाला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, November 13, 2013, 11:56