Last Updated: Sunday, August 18, 2013, 13:34
www.24taas.com , झी मीडिया, बंगळुरूक्रिकेटमध्ये ‘टी-२०’चा समावेश करण्यात आल्यानं, क्रिकेट आणखी रोमांचक झाल्याचं, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं म्हटलंय. बंगळुरूमध्ये बोलत होता.
‘टी-२०’ क्रिकेटमुळं गेल्या काही वर्षांत स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असलेल्या खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळतंय. पण त्यांच्याकडून साजेशी कामगिरी होत नाही. त्यामुळं खेळाडूंनी कसोटी क्रिकेटकडं जास्त लक्ष देऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली पाहिजे, असं सचिनला वाटतं.
“ट्वेंटी-२० क्रिकेटमुळं टेस्ट मॅचेसही अधिकाधिक निकाल लागण्यास मदत होईल. क्रिकेट हा असा खेळ आहे, की तो तिन्ही प्रकारामध्ये प्रसिद्ध आहे. या वेगवेगळ्या प्रकाराची क्रिकेटप्रेमींमध्येही उत्सुकता आहे. ‘टी-२०’मध्ये बॅट्समनना जास्तीतजास्त धोका पत्करण्याची संधी असते आणि तीन-चार चेंडूतही तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता”, असंही सचिन म्हणाला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, August 18, 2013, 13:34