इंग्लंड मजबूत स्थितीत, टीम इंडियाचं काही खरं नाही..., eng Vs india

इंग्लंड मजबूत स्थितीत, टीम इंडियाचं काही खरं नाही...

इंग्लंड मजबूत स्थितीत, टीम इंडियाचं काही खरं नाही...
www.24taas.com, कोलकाता

इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलेस्टर कुकने तिस-या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व मिळवत आपली धुव्वांधार फटकेबाजी कायम ठेऊन संघाला मजबूत स्थितीत नेले. परंतु, त्‍याला द्विशतकाने पुन्‍हा हुलकावणी दिली. त्‍याला एकही भारतीय गोलंदाज बाद करु शकला नाही. अखेर तो 190 धावांवर धावबाद झाला.

कुक बाद झाल्‍यानंतर इंग्‍लंडचे फलंदाज झटपट बाद झाले. पीटरसन पाठोपाठ समित पटेलही बाद झाला. पटलेने 33 धावांची खेळी करीत इंग्‍लंडची आघाडी वाढविली. ओझाने त्‍याची विकेट घेतली. तिस-या दिवसअखेर इंग्लंडची स्थिती भक्कम असून, त्यांनी ६ बाद ५०९ धावापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे इंग्‍लंडकडे 193 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी असून, अद्याप त्यांचे चार गडी बाद होणे बाकी आहे. पहिले तीनही दिवस कोलकाता कसोटीवर इंग्लंडने एकहाती वर्चस्व राखले आहे.

दुस-या दिवसअखेर इंग्लंडने पहिल्या डावात १ बाद २१६ धावा काढल्या होत्या. त्यापुढे आज खेळताना कूकने आपले दीडशतक पूर्ण करत द्विशतकाकडे वाटचाल केली होती. मात्र १९० धावांवर धावबाद झाला. त्याआधी भारताला ब-याच वेळानंतर जोनाथन ट्रॉटला अखेर बाद करण्यात यश मिळाले होते. त्याला ८७ धावावर ओझाने धोनीद्वारे झेलबाद केले. इयान बेल ५ धावांवर धोनीकडे झेल देऊन बाद झाला. केविन पीटरसन झटपट ५४ धावा काढून बाद झाला. त्याला अश्विनने पायचित केले.

First Published: Friday, December 7, 2012, 23:43


comments powered by Disqus