पीचवर लघुशंका : इंग्लंडच्या खेळाडुंचा माफीनामा, England`s cricketers apologise for urinating on The Oval pitch

पीचवर लघुशंका : इंग्लंडच्या खेळाडुंचा माफीनामा

पीचवर लघुशंका : इंग्लंडच्या खेळाडुंचा माफीनामा
www.24taas.com, झी मीडिया, लंडन

अॅशेस मालिकेत रविवारी रात्री पाचवा आणि शेवटचा सामना संपल्यानंतर इंग्लंडच्या टीमनं रात्री एकच जल्लोष केला. विजयाची गुर्मी अशी चढली की टीमच्या तीन खेळाडूंनी ओव्हल पीचवरच लघुशंका केली. या वर्तनाबद्दल उशीरा का होईना पण टीमनं जाहीर माफी मागितलीय.

‘अॅशेज मालिकेतील विजयाचा आनंद साजरा करताना रात्री उशिरा झालेल्या या प्रकारामुळे सारे काऊंटी क्रिकेट क्लब, ओव्हल मैदान किंवा आमचे ज्या खेळावर प्रचंड प्रेम आहे, त्या क्रिकेटशी संबंध असलेल्या कोणाचाही अवमान करण्याचा आमचा हेतू नव्हता. एक संघ म्हणून विरोधी संघ आणि ज्या मैदानावर खेळतो तेथील खेळपट्‌ट्यांचा आम्ही आदरच करतो. मात्र, ही अत्यंत प्रतिष्ठित मालिका जिंकल्याचा आनंद साजरा करताना आम्ही लक्ष्मणरेषा ओलांडली, हे आम्ही मान्य करतो’ असं इंग्लंड अॅन्ड वेल्स क्रिकेट मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय. ‘झाल्या प्रकाराने कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर आम्ही त्याबद्दल माफी मागतो. ही खरोखरच एक चूक होती’ असंही या माफिनाम्यात म्हटलं गेलंय.

इंग्लंड संघाने ऍशेस मालिका विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. रात्री उशिरापर्यंत मैदानातच बियर पिऊन इंग्लंडचे खेळाडू आनंद साजरा करीत होते. यादरम्यान, केव्हिन पीटरसन, जेम्स ऍण्डरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी खेळपट्टीजवळच लघुशंका केल्याचे मैदानावर उपस्थित ऑस्ट्रेलियन पत्रकारांच्या निदर्शनास आलं. दुसर्याळ दिवशी याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ईसीबीसह क्रिकेटप्रेमी हादरून गेले. त्यानंतर र्ईसीबीने झाल्या प्रकाराच्या चौकशीचे आदेशही दिले. ब्रिटनचे क्रीडामंत्री ह्यूज रॉबर्टसन यांनीही अशा प्रकारचे वर्तन अयोग्य असल्याचे नमूद केलं होतं. इंग्लंडचा ऑफस्पिनर ग्रॅम स्वानने हा प्रकार घडल्याचे मान्य केले होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 29, 2013, 11:52


comments powered by Disqus