Last Updated: Wednesday, November 14, 2012, 13:27
www.24taas.com, अहमदाबादभारत आणि इंग्लंड दरम्यान भारतीय भूमीवर चार टेस्ट खेळल्या जाणार आहेत. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये पत्कराव्या लागलेल्या लाजीरवाण्या पराभवचा बदला घेण्याची धोनी ब्रिगेडला चांगली संधी चालून आलीय. धोनी आता काही करून दाखवणार का? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. भारताला भारतातच आव्हान देण्यासाठी इंग्लिंश ब्रिगेड भारतीय भूमीवर येऊन दाखल झालीय.
भारतीय भूमीवर फिरकीचा सामना करण्याचं आव्हान आता ऍलिस्टर कूक एँड कंपनीवर असणार आहे. तर धोनी ब्रिगेडसमोर मायदेशात इंग्लंडला क्लिन स्विप देण्याच आव्हान असेल. भारतात इंग्लंडविरूद्ध भारताने आतापर्यंत 51 टेस्ट खेळल्या आहेत. यामध्ये भारताने 14 तर 11 वेळा इंग्लंड टीमने विजय मिळवलाय. तर 26 वेळा टेस्ट ड्रॉ झाल्या आहेत. तर भारत आणि इंग्लंड दरम्यान आतापर्यंत एकूण 103 टेस्ट खेळल्या गेल्या आहेत.
यामध्ये भारताने 19वेळा विजय मिळवलाय. तर तब्बल 38 वेळा इंग्लंड विजयी ठरली आहे. तर 46 वेळा टेस्ट ड्रॉ झाल्या आहेत. केवळ परदेशातच नव्हे तर मायदेशातदेखील इंग्लंडविरूद्ध कामगिरी सुधारण्याची भारताला गरज आहे. दरम्यान गेल्यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या लाजीरवाण्या पराभवचा बदला घेण्याची नामी संधी भारताला चालू आलीय. आता भारतीय भूमिवर धोनी ब्रिगेड इंग्लिश ब्रिगेडला क्लिन स्विप देते का याकडेच भारतीय क्रिकेट रसिकांच लक्ष लागून राहिल आहे.
First Published: Wednesday, November 14, 2012, 13:14