क्रिकेटमधला लाजीरवाणा आणि गंमतीशीर विक्र English cricket club Wirral CC all out for three in match a

क्रिकेटमधला लाजीरवाणा आणि गंमतीशीर विक्रम

क्रिकेटमधला लाजीरवाणा आणि गंमतीशीर विक्रम
www.24taas.com, झी मीडिया, इंग्लड

क्रिकेटमधील एक लाजीरवाणा विक्रम इंग्लिश क्लब क्रिकेटमध्ये खेळतांना व्हायरल-सीसी टीमने केलाय. हॅस्लिंगट टीम विरोधात खेळतांना व्हायरल-सीसीने अवघ्या तीन धावात आपला डाव गुंडाळलाय.

व्हायरल-सीसी या टीममधील 10 खेळाडू शून्यावर बाद झाले. व्हायरल सीसी टीमच्या या अकरा खेळाडूंनी 57 चेंडूंचा सामना केल्यानंतर 3 धावा काढल्या, त्यातील शेवटची धाव अकराव्या खेळाडूने काढली, उरलेल्या दोन धावा लेग बाईजमधून मिळाल्या आहेत.

हॅस्लिंगट टीमने व्हायरल-सीसी टीमसमोर 108 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, हा सामना हॅस्लिंगटन टीमने 105 धावांनी जिंकला.

खरं तर हा विक्रम की पराक्रम अशी चर्चा सुरू झालीय, हे खेळाडू किक्रेट खेळत होते की बोल अडवत होते, असा प्रश्न तुम्हाला स्कोअरकार्ड पाहिल्यानंतर नक्की पडेल.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 27, 2014, 18:55


comments powered by Disqus