धोनीला २० हजार डॉलर्सचा दंड Fine to Dhoni

धोनीला २० हजार डॉलर्सचा दंड

धोनीला २० हजार डॉलर्सचा दंड
www.24taas.com, चेन्नई

कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जनी विजय मिळवला. मात्र चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याला मात्र संथ गतीने ओव्हर टाकल्याबद्दल दंड भरावा लागला आहे.

मॅच संपल्यावर धोनीने दोन ओव्हर्स लेट केल्या असल्याचं लक्षात आलं. या सीझनमध्ये पहिल्यांदाच धोनीकडून अशी चूक झाल्याबद्दल त्याला २० हजार डॉलर्सचा दंड भरावा लागला आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला १४ रन्सने हरवलं होतं.


चेन्नईने कोलकात्याला २०१ धावांचं आव्हान उभं केलं होतं. मात्र कोलकाता नाइट रायडर्सची टीम १८६ धावाच करू शकली. त्यामुळे हा सामना चेन्नईनेच जिंकला होता.

First Published: Monday, April 29, 2013, 16:07


comments powered by Disqus