विनोद कांबळीला परदेशी महिलेने म्हटले `ब्लॅक इंडियन `, foreign women said Vinod Kambli Black Indian

विनोद कांबळीला परदेशी महिलेने म्हटले `ब्लॅक इंडियन `

विनोद कांबळीला  परदेशी महिलेने म्हटले `ब्लॅक इंडियन `
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

क्रिकेटपटू विनोद कांबळीला `ब्लॅक इंडियन ` म्हणून एका परदेशी महिलेने हिणवलं. बांद्रा येथे राहणाऱ्या विनोद कांबळीच्या सोसायटीमध्ये पार्किंगवरून या महिलेने वाद घातला.

या वादानंतर विनोद कांबळीनं वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. परदेशी महिलेनं वर्णभेदी टिप्पणी केल्याची तक्रार दाखल केलीय. त्याच्या बिल्डिंगमध्ये राहणा-या महिलेसोबत पार्किंगवरून वाद झाला. आपल्या या परदेशी महिलेनं `ब्लॅक इंडियन ` म्हटल्याचं सांगितलंय. त्यानंतर विनोद कांबळीनं पोलिसांत तक्रार दाखल केली.

पार्किंगबाबत या महिलेची तक्रार होती. तिने थेट दादागिरी करण्यास सुरूवात केली. मी तिला सांगितले की, सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याशी बोला. मात्र, ती महिला मला बघून घेईन असे सांगून माझी खूप ओळख आहे. त्यानंतर मी म्हटले आपल्याला जे करायचे आहे ते कर. त्यानंतर ही महिला मला `ब्लॅक इंडियन ` म्हटलं, अशी माहिती विनोद कांबळी याने झी मीडियाशी बोलताना सांगितली.

भारतात येणाऱ्यांनी भारताचा सन्मान केला पाहिजे तर देशाचा अपमान नव्हे. यामुळे तिला पोलिसांनी शिक्षा केली पाहिजे. तसेच भारताबाहेर हाकलून दिले पाहिजे. त्यामुळे एक चांगला मेसेज जाईल, भारताचा कोणीही अपमान करणार नाही, असे विनोद कांबळी तक्रारीनंतर बोलला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Friday, October 25, 2013, 08:50


comments powered by Disqus