बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांचे निधन , Former BCCI secretary Jaywant Yeshwant Lele passes away

बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांचे निधन

बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांचे निधन
ww.24taas.com, झी मीडिया, वडोदरा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांचे निधन झालं आहे. हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालंय. गुजरातमधील वडोदरा येथे लेले यांचे निधन झालं आहे.

ते ७५वर्षांचे होते. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्नी, मुलगा आणि मुलगी आहे. लेलेंनी तीन दिवसांपूर्वीच ७५ वा वाढदिवस मोठ्या उत्‍साहात साजरा केला होता.

लेले यांनी १९९६ ते २००१ या कालावधीत बीसीसीआयचे सचिव म्‍हणून काम पाहिले होते. याच कालावधीत क्रिकेटला बदमान करणारे मॅच फिक्सिंग प्रकरण उघडकीस आले होते.

त्यांचे `व्हेन आय वॉझ देअर` हे त्यांचे आत्मचरित्र गाजले होते. या आत्मचरित्रातून त्‍यांनी मॅच फिक्सिंग प्रकरणावर भाष्‍य केले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, September 20, 2013, 10:36


comments powered by Disqus