गंभीर जखमी, टी-२० वर्ल्डकपआधी भारताला `गंभीर धक्का`,Gambhir injured during WT-20 warm-up match

गंभीर जखमी, वर्ल्डकपआधी भारताला `गंभीर धक्का`

गंभीर जखमी, वर्ल्डकपआधी भारताला `गंभीर धक्का`
www.24taas.com, कोलंबो

टीम इंडियाचा धडाकेबाज ओपनिंग बॅट्समन गौतम गंभीर दुखापतग्रस्त झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या प्रॅक्टिस मॅचमध्ये त्याला दुखापत झाली. लंकेचा फास्ट बॉलर लसिथ मलिंगाचा बॉल गंभीरला लागला. आणि तो मॅच अर्धवट सोडून मैदानाबाहेर परतला.

दुखापत झाल्य़ानं त्याला हॉस्पिटलमध्येही नेण्यात आलं. त्याला लागलेल्या दुखापतीचा स्कॅनही करण्यात आलाय. त्याची दुखापत कितपत गंभीर आहे, याबाबत अजूनही काही स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, गंभीरला दुखापत झाल्यानं भारतीय गोटात सध्या चिंतेचं वातावरण आहे. भारताचं मिशन वर्ल्ड कप १९ सप्टेंबरपासून अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचनं सुरु होणार आहे. त्यामुळे गंभीर या मॅचपर्यंत फिट व्हावा अशी आशा भारतीय क्रिकेटप्रेमी सध्या करतायेत.

First Published: Saturday, September 15, 2012, 12:59


comments powered by Disqus