सौरव गांगुली होणार क्रीडा मंत्री, भाजपची ऑफर!Ganguly offered BJP ticket, yet to decide: Reports

सौरव गांगुली होणार क्रीडा मंत्री, भाजपची ऑफर!

सौरव गांगुली होणार क्रीडा मंत्री, भाजपची ऑफर!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

माजी भारतीय कॅप्टन सौरव गांगुली पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये खासदारकीसाठी उभं राहण्याची शक्यता आहे.

२०१४ निवडणूकांकरता भारतीय जनता पार्टीनं गांगुलीसमोर खासदारकीचं तिकीट देण्याचा प्रस्ताव मांडला असला. तरी गांगुलीनं मात्र या प्रस्तावाबाबत अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती स्थानिक वृत्तपत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनूसार भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी गांगुलीसमोर हा प्रस्ताव मांडल्याचं कळतंय. तसंच त्यांनी या बंगाली क्रिकेटरला कॅबिनेट क्रीडा मंत्री बनवण्याचं वचन दिल्याची माहिती या वृत्तपत्रांनी दिली आहे.

गांगुलीनंही वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाजपाकडून खासदारकीचा प्रस्ताव मिळाल्याचं मान्य केलं आहे. बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण ४२ सीट्स आहेत. ज्यांत भाजपाकडे एकमेव सीट आहे ती दार्जिलिंगची.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, December 14, 2013, 17:05


comments powered by Disqus