Last Updated: Tuesday, July 9, 2013, 13:51
www.24taas.com,झी मीडिया,कोलकाता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने महेंद्रसिंग याचे कौतुक करतानाच, धोनीला भारताचा एकदिवसीय भारतीय संघाचा सर्वोत्कृष्ट कर्णधार असल्याचं मान्य केलंय. आपल्या ४१व्या वाढदिवसाच्या निमित्ताने बोलताना गांगुली म्हणाला की, 'धोनीनं अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. जर मला संघ निवडायचा असता तर अकरा जणांच्या संघाचा कर्णधार नक्कीच महेंद्रसिंग धोनी असता'
'मी आतापर्यंत धोनीसारखा सर्वश्रेष्ठ गोलंदाज तसेच उत्तम विकेट किपर बघितलेला नाही. टेस्ट कसोटीच्या संघासाठी भले मला विचार करावा लागेल मात्र एकदिवसीयसाठी माझी पसंती फक्त महेंद्रसिंग धोनीच असेल' असं त्यानं म्हटलंय. गांगुलीने हे ही स्पष्ट केलं की, निवड केलेल्या ११ जणांच्या संघात त्याचा समावेश असणार नाही.
आपली तुलना धोनीशी करण्यास नकार देत गांगुली म्हणाला, मी कधीच तुलनेवर विश्वास नाही करत. तुम्ही विविध दौरे, खेळाडू आणि प्रतिस्पर्ध्यांची तुलना नाही करु शकत आणि हे अशक्य आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला गांगुली आता आत्मचरित्र लिहिण्याचा विचार करतोय.
'मी योग्य वेळेची वाट बघत होतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडल्यानंतरही मी सतत व्यस्त होतो. आयपीएल होते पण आता मी लिहिणार आहे. हे सांगण कठीण आहे की, मी सर्व काही लिहिन पण यात काहीच वाद नाही की खरं तेच लिहीन' असं व्यक्तव्य गांगुलीने केलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, July 9, 2013, 13:25