गौतम गंभीरच्या घरी छोट्या परीचं आगमन, gautam gambhir become father

गौतम गंभीरच्या घरी छोट्या परीचं आगमन

गौतम गंभीरच्या घरी छोट्या परीचं आगमन

www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता

कोलकाता नाईट रायडर्स टीमचा कॅप्टन गौतम गंभीर याचा आनंद गगनात मावेनासा झालाय. त्याची गौतमची पत्नी नताशा हिनं एका गोंडस मुलीला जन्म दिलाय.

गंभीरच्या आयपीएल फ्रेंचायजीनं आपल्या ट्विटर पेजवर ही माहिती दिलीय. कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमनं गौतम आणि नताशा बाळाच्या आगमनाबद्दल अभिनंदन केलंय. शिवाय टीमच्या सीईओंनीही या जोडप्याला शुभेच्छा दिल्यात. केकेआरनं केलेल्या ट्विटमध्ये ‘गौतम गंभीर आणि नताशा गंभीर यांना शुभेच्छा... छोट्या परीचं कुटुंबामध्ये स्वागत आहे’ असं म्हटलंय.

गौतम गंभीर कॅप्टन असताना कोलकाता टीमनं आत्तापर्यंत 5 पैकी 2 मॅचमध्ये विजय प्राप्त केलाय. कोलकाताचा पुढचा सामना शुक्रवारी रांचीमध्ये चेन्नईसोबत होणार आहे.




* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 1, 2014, 21:26


comments powered by Disqus