`सुवर्ण सचिन` Gold coins embosses sachin

`सुवर्ण सचिन`

`सुवर्ण सचिन`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव सुवर्णाक्षऱांनी कोरणारा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता सोन्याच्या नाण्यावरही झळकला आहे. अक्षय तृतियेच्या निमित्ताने सचिन तेंडुलकरचं सोन्याचं नाणं बनवण्यात आलं.

अक्षय्य तृतीयाच्या निमित्तानं सोन्यानं मढवलेल्या स्वत:च्याच प्रतिमेचं अनावरण खुद्द सचिननंच केलं. मुंबईत एका शानदार समारंभात सचिननं या नाण्याचं अनावरण केलं. अक्षय्य तृतीयाचा मुहुर्त साधत त्याच्या चाहत्यांना ही स्पेशल ट्रीट मिळाली आहे. व्हॅल्यूमार्ट ज्वेलर्सनी अक्षय तृतियेनिमित्त सचिन तेंडुलकरच्या चेहऱ्याची मोहोर उमटवलेली १ लाख सोन्याची नाणी बाजारात आणली आहेत. प्रत्येक नाण्याचं वजन १० ग्रॅम आहे.

“मैदानात अनेक सोनेरी क्षण मी अनुभवले आहेत. हा मात्र वेगळाच सुवर्ण क्षण आहे.” असं सचिन या प्रसंगी म्हणाला. किशोरवयात आपण सोन्याची चेन गळ्यात घालण्याचे शौकीन होतो, असा जुन्या आठवणींना उजाळाही या वेळी सचिनने दिला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, May 13, 2013, 17:05


comments powered by Disqus