Last Updated: Monday, September 23, 2013, 08:55
www.24taas.com , झी मीडिया, रांचीचॅम्पियन्स लीगमध्ये महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं विजयी सलामी दिलीय. चेन्नईनं पहिल्या सामन्यात टायटन्सचा सहा विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात टायटन्स टीमनं चेन्नईसमोर विजयासाठी १८६ रन्सचं आव्हान ठेवलं होतं.
मायकल हसी, सुरेश रैना आणि ड्वेन ब्राव्होच्या खेळींच्या जोरावर चेन्नईनं त्या लक्ष्याचा सहज पाठलाग केला. हसी आणि रैनानं प्रत्येकी ४७ रन्स केल्या तर ब्राव्होनं ३८ रन्सची खेळी केली. त्याआधी टायटन्सनी २० ओव्हर्समध्ये ५ आऊट १८५ रन्सपर्यंत मजल मारली. टायटन्सकडून एबी डिव्हिलियर्सनं ७७ तर हेन्री डेव्हिड्सनं २ रन्स केले.
विजयी टीमची सुरूवात मात्र खराब झाली होती. तिसऱ्याच बॉलवर मुरली विजय शून्यवर आऊट झाला. रिलोफ वान डर मर्वनं त्याला बोल्ड केलं. त्यानंतर टॉवरचे लाईट गेल्यानं मॅच दहा मिनिटं थांबविण्यात आली. मात्र त्यानंतर खेळ सुरू होताच रैना आणि हसीनं बॉलर्सवर आपली पकड मजबूत केली. चेन्नईनं शेवटच्या क्षणी तीन विकेट गमावल्या पण १८.५ व्या ओव्हरमध्ये १८७ रन्सचं लक्ष्य गाढून विजय मिळवला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, September 23, 2013, 08:55