माझ्यात सर्वोत्तम खेळ करण्याची भूक कायम : गौतम गंभीर, i am always hungry for runs : gautam gambhir

माझ्यात सर्वोत्तम खेळ करण्याची भूक कायम : गौतम गंभीर

माझ्यात सर्वोत्तम खेळ करण्याची भूक कायम : गौतम गंभीर
www/24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

एका मुलाखतीत गौतम गंभीरने आपल्या मनातील सर्व काही चाहत्यांसमोर ठेवलं, गौतम गंभीर म्हणतो हे सत्य आहे की, माझी न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड झाली नाही, दौऱ्यासाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंना माझ्या शुभेच्छा आहेत.

मी नेहमी सांगतो मी फक्त टीम इंडियात परतण्यासाठी क्रिकेट खेळत नाहीय, तर माझ्या आत अजूनही सर्वोत्तम खेळी करण्याची मोठी भुक आहे.

मी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकेलेल्या टीमचा भाग व्हायचंय, कारण माझ्या ५४ टेस्ट मॅचेसमध्ये मी न्यूझीलंडमधील एकमेव मालिका जिंकली होती आणि दक्षिण आफ्रिकेतील सामना ड्रॉ झाला होता.

यासाठी मला पुन्हा टीम इंडियात परतण्यासाठी मेहनत घ्यायची आहे. मी स्वार्थासाठी कधीही क्रिकेट खेळलो नसल्याचं यावेळी गौतमने सांगितलं.

खरं सांगायचं तर मी कितव्या नंबरवर खेळण्यासाठी उतरावं, मी सलामीवीर किती नंबरवर योग्य आहे, हे मला माहित नाही, माझं काम आहे जास्तच जास्त धावा काढणे, आणि मी ते करत राहणार आहे.

मैदानात माझा खेळ नेहमीच आक्रमक ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे. जिंकणे माझ्यासाठी सर्वात महत्वाचे आहे, असंही गौतम गंभीरने म्हटलं आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, January 5, 2014, 20:38


comments powered by Disqus