Last Updated: Sunday, September 29, 2013, 17:16
www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबादआयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आरोप असलेले पाकिस्तानचे वादग्रस्त अम्पायर असद रौफ यांनी स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईमध्ये येण्यास नकार दिला आहे. मुंबई पोलिसांवर आपला विश्वास नसल्याचं यावेळी रौफ यांनी म्हटलं आहे.
``भारतीय न्यायसंस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे, पण मुंबई पोलिसांवर माझा विश्वास नाही. त्यामुळे सध्याच्या घडामोडींमुळे मला भारतात येणे जमणार नाही. मात्र मी माझ्या वकिलांचा सल्ला घेतला आहे. त्यानुसार आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा विभागाला पूर्ण चौकशीसाठी पूर्णपणे सहकार्य करेन,`` असे रौफ यांनी स्पष्ट केलं आहे..
आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात नाव येण्यापूर्वीही रौफ यांच्यावर एका भारतीय मॉडेलने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यामुळे रौफ कायमच वादात राहिले होते. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांनंतर (आयसीसी) रौफ यांची चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अम्पायर्सच्या पॅनेलमधून बाहेरचा रस्ता दाखवला होता.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, September 29, 2013, 17:16