मनोजची शतकी खेळी, सिलेक्टर संभ्रमात... , I`m ready to open in Tests: Manoj Tiwary

मनोजची शतकी खेळी, सिलेक्टर संभ्रमात...

मनोजची शतकी खेळी, सिलेक्टर संभ्रमात...

WWW.24taas.com चेन्नई

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज मनोज तिवारी शतकी खेळी करून निवड समितीला बुचकळ्यात टाकले आहे. चेन्नईत सुरू असलेल्या भारत “अ” आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात भारताचा फलंदाज मनोज तिवारी याने शानदार खेळी केली.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळवण्यात आलेल्या तीन दिवसीय सराव सामन्यात मनोज तिवारी पहिल्या डावात दुस-या दिवशी जोरदार शतकी खेळी केली. मनोजच्या या खेळीच्या जोरावर भारत “अ” संघाने पहिल्या डावात ४५१ धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रोलिया संघ ४५१ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर शेन वॉटसन याने ८४ धावा केल्या.

दुस-या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया संघाने चार विकेटच्या मोबदल्यात १३१ धावा केल्या. मैथ्यू वेड्स तीन धावांवर तर मोहीसेस हौनरिक्स याने अजून आपल खात उघडले नाही. सकाळी धुक्यामुळे सामना दोन तास उशिराने सुरु झाला होता.

मनोज तिवारीची ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवड झालेली नसली तरी त्याने आपल्या कामगिरीने निवड समितीच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये रणजी सामन्यांत झालेल्या दुखापतीतून सावरलो असल्याचे त्याने या आपल्या खेळीतून दाखवून दिले आहे. त्याने आपल्या खेळीत १८७ चेंडूत १२९ धावांची शतकी खेळी केली. हा सामना सुरू झाला त्यावेळी भारत अ संघाच्या ४ विकेट गमावून ३३८ धावांवर सुरू झाला होता. काल ऑस्ट्रेलियन गोलंदाजांला आपल्या संघाला साजेशी कामगिरी करण्यात यश आले नव्हते. पण आज मात्र ऑस्ट्रेलियन संघाच्या गोलंदाजांना भारत “अ” संघाला ४५१ धावांवर रोखण्यात यश आले. यात ऑस्ट्रेलियाच्या नॉथन लियॉन आणि एशटन एगर यांचा मोठा वाटा होता.

या सामन्यात भारत “अ” संघ ४५१ धावांसह मजबूत स्थितीत आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळवण्यात आलेल्या तीन दिवसीय सराव सामन्यात मनोज तिवारी पहिल्या डावात दुस-या दिवशी जोरदार शतकी खेळी केली. मनोजच्या या खेळीच्या जोरावर भारत “अ” संघाने पहिल्या डावात ४५१ धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रोलिया संघ ४५१ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर शेन वॉटसन याने ८४ धावा केल्या.

दुस-या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया संघाने चार विकेटच्या मोबदल्यात १३१ धावा केल्या. मैथ्यू वेड्स तीन धावांवर तर मोहीसेस हौनरिक्स याने अजून आपल खात उघडले नाही. सकाळी धुक्यामुळे सामना दोन तास उशिराने सुरु झाला होता.

First Published: Tuesday, February 19, 2013, 11:57

comments powered by Disqus