आयसीसी रँकिंग : जडेजा-धवनची उंच झेप!, ICC RANKING : JADEJA - DHAVAN HIGHER IN RANKING

आयसीसी रँकिंग : जडेजा-धवनची उंच झेप!

आयसीसी रँकिंग : जडेजा-धवनची उंच झेप!
www.24taas.com, झी मीडिया, बर्मिंगहॅम

‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ घशात घातल्यानंतर भारताची आयसीसीच्या १२३ गुणांसह क्रमवारीत पहिल्या नंबरची वर्णी लागली पण त्याचबरोबर खेळाडूंनीही क्रमवारीत मोठी झेप घेतलीय. रविंद्र जडेजा आणि शिखर धवन यांनी आयसीसीच्या क्रमवारीत अनुक्रमे तिसरं आणि एकोणतिसावं स्थान पटकवलंय.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत या दोघांनीही आपल्या करिअरमधील क्रमवारीत मोठी उडी घेतलीय. ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ पुरस्कार मिळवलेल्या शिखर धवनने ५० व्या स्थानावरुन २९ व्या स्थानावर झेप घेतलीय. त्याचबरोबर आर. अश्विन यानेही सहा गुणांची कमाई करत गोलंदाजीत पहिल्या दहामध्ये येण्याची कामगिरी केलीय. विराट कोहली तिसऱ्या स्थानावर तर कर्णधार महेंद्रसिंग धोनी खराब कामगिरीच्या जोरावर पाचव्या स्थानावर येऊन पोहोचलाय.

आयसीसीच्या क्रमवारीत १२३ गुणांसह भारत अव्वल आहे तर ११३ गुण घेऊन इंग्लंड दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी आहे

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 25, 2013, 15:14


comments powered by Disqus