भारताचा चषकही गेला, रॅंकींगही गमावले, ICC T20 rankings: India drop to second but Ashwin, Kohli rise

भारताचा चषकही गेला, रॅंकींगही गमावले

भारताचा चषकही गेला, रॅंकींगही गमावले
www.24taas.com, झी मीडिया, दुबई

टी - २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील दारुण पराभवामुळे भारताने टी - २० तील अव्वल रँकींगही गमावले आहे. टी - २० तील जगज्जेतेपदावर विराजमान होणा-या श्रीलंकेने आयसीसीच्या टी - २०मधील क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले असून भारत दुस-या क्रमांकावर घसरला आहे.

भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली फलंदाजांच्या यादीत दुस-या क्रमाकांवर पोहोचला असून विश्वचषकात फिरकी गोलंदाजीने फलंदाजांची भंबेरी उडवणा-या आर. अश्विननेही तिस-या क्रमांकवर झेप घेतली आहे.

विश्वचषकात सलग सामने जिंकून भारताने आयसीसीच्या टी - २० क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. मात्र अंतिम सामन्यातील दारुण पराभवामुळे भारताने अवघ्या ५ दिवसांत नंबर वनचा ताज गमावला आहे. श्रीलंकेने भारतावर मात करत १३३ गुणांसह अव्वल क्रमांक गाठले. त्यामुळे भारत दुस-या क्रमांकावर घसरला असून भारत सध्या १३० गुणांवर आहे.

भारताने अव्वल क्रमांक गमावला असला तरी कोहली आणि अश्विन या जोडीने टी - २० क्रमवारीत अव्वल तीन क्रमांकावर झेप घेतली आहे. विश्वचषकात ३१९ धावा ठोकणारा कोहली फलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक गाठला आहे. तर गोलदाजांच्या यादीत विश्वचषकात ११ विकेट घेणारा आर. अश्विन तिसरा क्रमांक गाठला आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 7, 2014, 21:08


comments powered by Disqus