Last Updated: Sunday, August 26, 2012, 09:34
www.24taas.com, क्विन्सलँड आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान ‘अंडर १९ वर्ल्डकप’ फायनल मॅच रंगतेय.
‘अंडर-१९ वर्ल्डकप’ फायनलमध्ये भारताचा कॅप्टन उन्मुक्त चंद यानं टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर बॅटींगसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियानं भारतीय टीमसमोर २२६ रन्सचं आव्हान ठेवलं आहे. भारताकडून संदीप शर्मानं सर्वाधिक चार विकेट्स घेत कांगारु बॅट्समनना रोखून धरलं. ऑस्ट्रेलियाकडून विल्यम बॉसिस्टोनं नॉटआऊट ८७ रन्सची इनिंग खेळली.
आता यंगिस्तानला वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्यासाठी कांगारुंनी दिलेल्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करावा लागणार आहे. भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास त्यांना तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याची नामी संधी आहे. आता टीम इंडिया कमाल करण्यात यशस्वी ठरणार का? भारताचं यंगिस्तान नवा इतिहास रचणार का? याकडेच सगळ्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय.
First Published: Sunday, August 26, 2012, 09:34