Last Updated: Thursday, August 23, 2012, 13:58
www.24taas.com, टाऊन्सविले आज दिवसभर प्रेक्षकांवर क्रिकेट फिव्हर चढतच जातोय जाण्याची चिन्ह आहेत... कारण, आज भारत विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट सीरिजमधली पहिल्या मॅच सुरू आहे तर दुसरीकडे ‘अंडर – १९’ टीमनं सेमीफायनल मॅचमध्ये न्यूझीलंडला पराभूत करत फायनलमध्ये धडक मारलीय.
भारताच्या अंडर-१९ टीमनं वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. भारतानं न्यूझीलंडला ९ रन्सनं पराभूत करत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये चमकदार कामगिरी करत भारतानं फायनल गाठली आहे. प्रशांत चोप्राची ५२ रन्सची इनिंग भारताच्या विजयात निर्णायक ठरली. तर मुंबईकर हरमीत सिंगच्या स्पिन बॉलिंगची जादू चांगलीच चालली. त्यानं ३० रन्स देत किवींच्या २ महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या. प्रशांत चोप्राला 'मॅन ऑफ द मॅच'चा गौरव प्राप्त झाला. आता फायनलमध्ये भारताचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
टॉस जिंकत न्यूझीलंडनं पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय ‘अंडर १९’ टीमनं न्यूझीलंडसमोर २१० रन्सचं आव्हान ठेवलं होतं. भारताची सलामीची जोडी प्रशांत चोप्रा आणि उन्मुक्त चंद यांनी अर्धशतकी सलामी दिल्यानंतर चंदनं ३१ रन्स केले. त्यानंतर चोप्राने बाबा आपराजितला सोबत घेत भारताला सुस्थित नेण्यात यशस्वी झाला. या दोघांनी दुस-या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. या काळात चोप्राने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर तो लगेच ५२ धावांवर बाद झाला. त्याने १०४ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ५२ धावा केल्या. बाबा आपराजितने ४४ धावांचे योगदान दिले. त्यानंतर विहारीनं २२ आणि समीत पटेल १५ यांचे योगदान सोडता इतरांना छाप पाडता आली नाही. भरवशाचा विजय झोल शून्यावर बाद झाला.
First Published: Thursday, August 23, 2012, 12:55