दक्षिण आफ्रिकेचा दुसरा रोमांचक विजय, ICC World Twenty20: Netherlands vs South Africa – Live Sco

दक्षिण आफ्रिकेचा दुसरा रोमांचक विजय

www.24taas.com, झी मीडिया, चितगांव

अत्यंत चुरशीच्या सामन्यात पुन्हा एकदा जिगरबाज गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेने नेदरलँडला ६ धावांनी पराभूत करत साखळी सामन्यातील दुसरा रोमांचक विजय नोंदविला.

दक्षिण आफ्रिकेच्या ९ बाद १४५ धावांचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ ३९ धावांवर गारद झाला. आफ्रिकेकडून इमरान ताहीरने २१ धावा देऊन ४ विकेट घेतल्या. डेल स्टेनने २ हेड्रीक्स, तोत्सोबे आणि ड्युमिनी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. नेदरलँडकडून मायबर्ग याने सर्वाधिक ५१ धावा केल्या. त्याने २८ चेंडूत ८ चौकार आणि दोन षटकारांसह ही कामगिरी केली.

सुरूवातीला नाणेफेक जिंकून नेदरलँडने प्रथम क्षेत्ररक्षण घेतले. दक्षिण आफ्रिकेने ९ बाद १४५ धावा केल्या. यात हाशिम आमला ४१ ड्यप्लसिस २४, डिव्हिलिअर्स २१ धावा केल्या. नेदरलँडकडून जमाली याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत ४ ओव्हर्समध्ये १९ धावा देत ५ विकेट घेतल्या.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 27, 2014, 15:52


comments powered by Disqus