टीम इंडिया वनडेत नंबर वन, India claim top spot in ICC ODI rankings

टीम इंडिया वनडेत नंबर वन

टीम इंडिया वनडेत नंबर वन
www.24taas.com,दुबई

टीम इंडियान इंग्लंडविरूद्ध खेळताना पहिल्याच सामन्यात मार खल्ल्यानंतर सलग दोन्ही सामने जिंकत वनडेत आपणच नंबर वन असल्याचे दाखवून दिले आहे. टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-१ अशी टीम इंडियाने आघाडी घेतली आहे. रांचीमध्ये इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा न्यूझीलंडने पराभव केल्याने भारताला पहिले स्थान मिळाले आहे.

भारत क्रमवारीत ११९ गुणांसह पहिल्या, तर इंग्लंड ११८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ ११६ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका सुरु होण्यापूर्वी भारताचा संघ क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर होता. मात्र, सलग दोन एकदिवसीय सामने जिंकल्याने टीम इंडियाने थेट पहिल्या स्थानापर्यंत झेप घेतली. टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धचे उर्वरित दोनपैकी एक सामना जिंकून अव्वल स्थान टिकविण्याची संधी आहे.

First Published: Sunday, January 20, 2013, 14:16


comments powered by Disqus