धोनीचा नवा डाव, पहिली इनिंग घोषित , India v England at Nagpur

धोनीचा नवा डाव, पहिली इनिंग घोषित

धोनीचा नवा डाव, पहिली इनिंग घोषित
www.24taas.com,नागपूर

नागपूर टेस्टच्या चौथ्या दिवशी कॅप्टन धोनीने धाडसी निर्णय घेत भारताची पहिली इनिंग ९ आऊट ३२६ रन्सवर घोषित केला.

इंग्लंडला माफक ४ रन्सची आघाडी दिली... सीरिजमध्ये २-१ने पिछाडीवर असलेली टीम इंडिया नागपूर टेस्ट जिंकून सीरिज ड्रॉ करण्याच्या तयारीत आहे... त्यामुळे सेकंड इनिंगमध्ये भारतीय बॉलर्ससमोर आव्हान असणार आहे ते इंग्लंडचा डाव झटपट गुंडाळण्याचं.

तत्पूर्वी ८ आऊट २९७ पासून पुढे खेळण्यास सुरूवात करणा-या अश्विन-ओझा जोडीने भारताला ३१७ पर्यंत मजल मारून दिली आणि ओझा पानेसरच्या बॉलिंगवर आऊट झाला. भारताची इनिंग घोषित झाली तेव्हा अश्विन २९ रन्सवर तर ईशांत शर्मा २ रन्सवर नॉट आऊट होता.

First Published: Sunday, December 16, 2012, 11:14


comments powered by Disqus