Last Updated: Monday, February 25, 2013, 11:07
www.24taas.com,चेन्नई /b>
चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडिया ५७२ रन्सवर ऑल आऊट झाली आहे. धोनीच्या २२४ रन्सच्या जोरावर भारतीय टीमनं १९२ महत्वाची आघाडी घेतली आहे.
धोनीच्या कॅप्टन्स नॉकमुळेच टीम इंडियाला चेन्नई टेस्टवर आपलं वर्चस्व गाजवता आलंय. आपली टेस्टमधील सर्वोत्तम इनिंग खेळत माहीनं सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलय़ं. भारतीय कॅप्टन म्हणून त्यानं सर्वोत्तम इनिंग खेळली. त्यानं सचिनचा २१७ रन्सचा रेकॉर्ड मोडित काढला.
भुवनेश्वर कुमार आणि महेंद्रसिंग धोनीनं ९ विकेट्ससाठी केलेली १४० रन्सची पार्टनरशीप टीम इंडियाच्या इनिंगमध्ये निर्णायक ठरली. ऑस्ट्रेलियाकडून जेम्स पॅटिन्सननं भारताच्या ५ बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. आश्वासक आघाडी घेतल्यानंतर आता भारतीय बॉलर्स कांगारुंना झटपट आऊट करण्याचा प्रयत्न करतील.
धोनीच्या २२४ रन्सच्या जोरावर भारतीय टीमनं आघाडी घेतली आहे. धोनीच्या कॅप्टन्स नॉकमुळेच टीम इंडियाला चेन्नई टेस्टमवर आपलं वर्चस्व गाजवता आलंय. आपली टेस्टमधील सर्वोत्तम इनिंग खेळत माहीनं सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलय़ं.
First Published: Monday, February 25, 2013, 11:03