Last Updated: Thursday, March 7, 2013, 13:18
www.24taas.com, मुंबईऑस्ट्रेलियाविरुद्ध उर्वरित दोन टेस्टसाठी टीम इंडिया जाहीर झालीय..वीरेंद्र सेंहवागला टीममधून डच्चू देण्यात आला आहे. तर हरभजन सिंगने मात्र टीममधील स्थान कायम राखलं आहे.
वीरुच्या गेल्या दहा टेस्टमधील आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या गेल्या दोन टेस्ट परफॉर्मन्सचा फटका वीरेंद्र सेहवागला बसला आहे. वीरेंद्र सेहवागचा शेवटच्या १० टेस्टमध्ये २९.२९च्या सरासरीने ४९८ रन आहेत.
तर ऑस्ट्रेलिया सोबत झालेल्या शेवटच्या दोन टेस्टमध्ये त्याला फक्त २७ रन करता आल्या आहेत. त्यात १९ रन ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याच्या ह्या खराब परफॉर्मन्समुळेच निवड समितीने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ऑस्टेलिया सोबत असणाऱ्या दोन टेस्ट साठी टीम इंडिया पुढील प्रमाणे असणार आहे.
टीम इंडिया - महेंद्रसिंग धोनी (कॅप्टन), मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रविंद्र जडेजा, हरभजन सिंग, आर. अश्विन, प्रग्यान ओझा, भुवनेश्वर कुमार, अजिंक्य रहाणे, अशोक डिंडा, शिखर धवन, इशांत शर्मा
First Published: Thursday, March 7, 2013, 13:16