Last Updated: Monday, June 16, 2014, 12:03
www.24taas.com, झी मीडिया, मीरपूरबांग्लादेशविरुद्ध वन-डे सीरिजमध्ये टीम इंडियानं अपेक्षेप्रमाणे विजयानं सुरुवात केली. टीम इंडियानं पहिल्या वन-डेत बांग्लादेशवर 7 विकेट्सने मात केली.
अजिंक्य रहाणेनं 64 रन्सची इनिंग खेळत भारतीय टीमच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. या विजयासह भारतानं तीन वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली.
या सामन्यात बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 272 धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना भारतानं 1 बाद 99 धावा केल्या. पण पावसानं व्यत्यय आणल्यामुळे खेळ थांबवण्यात आला.
खेळ पुन्हा सुरू झाला आणि डर्कवर्थ लुईस नियमानुसार भारताला 26 षटकांत 150 धावा करण्याचं आव्हान मिळालं.
भारतानं हे आव्हान सात विकेट्स आणि सात चेडू राखून सहज पार केलं. भारताचे सलामीवीर रॉबिन उथाप्पा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनीही अर्धशतकं ठोकली तसेच 99 धावांची भागादीरी केली.
उथाप्पानं 44 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकरांसह 50 धावा केल्या. तर रहाणेनं 70 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 64 धावांची खेळी आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, June 16, 2014, 12:03