सेहवागचे वादळी शतक, पण सचिन झटपट बाद, India vs England, 1st Test: Sehwag scores ton

सेहवागचे वादळी शतक, पण सचिन झटपट बाद

सेहवागचे वादळी शतक, पण सचिन झटपट बाद

www.24tass.com, अहमदाबाद
इंग्लंडविरुद्धच्या अहमदाबाद कसोटीत वीरेन्द्र सेहवागने शानदार शतक ठोकलं आहे. तब्बल दोन वर्षांनंतर त्याने हे कसोटी शतक साजरं केलं आहे. सेहवागच्या या धडाकेबाज शतकामुळे भारताची स्थिती मजबूत झाली आहे. परंतु, सचिन तेंडुलकरने पुन्हा एकदा निराशा करत तो केवळ १३ धावांवर बाद झाला आहे.

सेहवागने ग्रॅमी स्वानच्या चेंडूवर चौकार ठोकत शतक पूर्ण केलं. ९० चेंडूंमध्ये १५ चौकार आणि १ षटकारासह सेहवागने शतकाचा आकडा गाठला. कसोटीत सहवागचं हे २३वं शतक आहे. त्यानंतर त्याला स्वानने त्रिफळाचित केले. ११७ चेंडूत ११७ धावा केल्या.

४ नोव्हेंबर २०१० साली सेहवागने अहमदाबादमध्येच न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावलं होतं. त्यानंतर जणू त्याच्यावर धावा रुसल्या होत्या. सेहवागला कसोटी क्रिकेटमध्ये साजेशी कामगिरी करता येत नव्हती. पण आज अहमदाबाद कसोटीत तो सुरुवातीपासूनच भलत्याच मूडमध्ये दिसत होता. सेहवागने पहिल्या सत्रात ४५ चेंडूत ८ चौकार लगावत अर्धशतक साजरं केलं.

त्याआधी ग्रॅमी स्वानने गौतम गंभीरचा ४५ धावांवर त्रिफळा उडवत त्याला बाद केलं. सुरुवातीपासूनचं गंभीर स्वानच्या फिरकीसमोर गडबडताना दिसत होता. याचाच फायदा स्वानने घेत गंभीरला बाद केलं. गंभीरला १११ चेंडूत ४५ धावांची खेळी करता आली.

First Published: Thursday, November 15, 2012, 14:21


comments powered by Disqus